विधी महाविद्यालयाचा उदघाटन सोहळा..
पनवेल / प्रतिनिधी : कमलगौरी हिरु पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना रायगड जिल्हा संपर्क नेते बबनदादा पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचा भव्य उदघाटन शुभारंभ मा मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते तळोजा येथे आज होणार आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात बबनदादा यांनी भरारी मारली आहे. त्यांच्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या तळोजे फेस २ येथील बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचा उदघाटन शुभारंभ आज सोमवार दि .४ मार्च रोजी दुपारी २ वाजता तळोजे फेस २ ,पेंधर मेट्रो स्टेशन जवळ, पनवेल येथे होत आहे. तसेच आज दुपारी ४ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गार्डन हॉटेल जवळ,पनवेल येथे होणार आहे.
सदर उदघाटन समारंभास तसेच जनसंवाद मेळाव्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना जिल्हा संपर्क नेते बबनदादा पाटील यांनी केले आहे.