सायकल रॅलीचे आयोजन..
                       सायकल रॅलीचे आयोजन..


पनवेल / प्रतिनिधी -  : दिनांक 31 मार्च, 2024 रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिळफाटा खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कर्जत दरम्यान ( अंतर 17 किलोमीटर ) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
      अजित नैराळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 189 कर्जत विधानसभा संघ यांनी हिरवा झेंडा दाखवत सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, आयुब तांबोळी, तहसीलदार खालापूर, डॉ. शीतल रसाळ, तहसीलदार कर्जत यांचेसह अपघात ग्रस्ताचे मदतीसाठी, लायन्स क्लब, खोपोली इत्यादी सेवाभावी संस्था यांचे प्रतिनिधी, सर्वच प्रशासकीय विभाग यांसह 250 हुन अधिक नागरिकांनी सायकल रॅली मध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला. सदर रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कर्जत व नवीन प्रशासकीय इमारत कर्जत येथे झाली.
Comments