शिवसेनेत(उद्धव बाळासाहेब ठाकरे)जाहीर पक्षप्रवेश..
पनवेल - शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका व खारघर फोरमच्या अध्यक्षा लीना गरड व त्यांच्या असंख्य कार्यकर्ते यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात जाहीर प्रवेश शिवसेना भवन येथे झाला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने व तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या सहकार्याने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका लिना गरड, उद्योजक मधु पाटील, कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश आढाव, मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत शिवाजीराव अनगुडे,शिंदे गटाच्या जान्व्ही घाडगे,भाजप उत्तरप्रदेश सेलचे गजेंद्र सिंग,विनय दुबे, नवीन पनवेल भाजपचे वार्ड अध्यक्ष तथा पेण तालुका रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे,समाजसेवक शशिधर माळी,भाजपचे आकाश म्हात्रे, किरण म्हात्रे,विश्वनाथ पाटील,सर्जेराव पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते तथा कोकण संपर्क नेते सुभाष देसाई, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिनभाऊ अहिर, शिवसेना उपनेते विजय कदम , मावळ लोकसभा संघटक तथा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील,मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, विधानसभा संपर्कप्रमुख वैभव सावंत, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत,उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहरप्रमुख खारघर गुरुनाथ पाटील, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, ग्रामीण विभागप्रमुख दत्ता फडके, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, रत्नाकर पाटील, नवीन पनवेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.