कु.अविष्का महेश घरत ठाणे जिल्ह्यात प्रथम...
पनवेल / वार्ताहर :-
एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.सदर परीक्षेत कु. अविष्का महेश घरत हिने ठाणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
अविष्का महेश घरत ही ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे नवी मुंबई या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी तिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८७.३३% गुण मिळवून नवी मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकाविला होता.
एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत अविष्का घरतने मिळविलेल्या या घवघवीत यशात सारिका अजित देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर परीक्षेत ज्ञान विकास विद्यालयाचे ओमकार तानाजी काळे, वैष्णवी संतोष शेलार, शिवराज अनिल चटाले, सत्यवान संदीप धापते, आयुष किशोर सोलंकर, रसिका रमेश शेळके, दिशा रामू महाले हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षासाठी तब्बल साठ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पी.सी. पाटील, ज्येष्ठ संचालक बळीराम म्हात्रे, प्रशासकीय अधिकारी रामदास बिडवे, अध्यक्ष प्रसाद पाटील, मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.