लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी केली बूथ निहाय मतदान केंद्राची पाहणी..
       बूथ निहाय मतदान केंद्राची पाहणी..   
 


पनवेल / प्रतिनिधी : -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या चार दिवसापासून  पनवेल शहर पोलिसांनी हद्दीतील एकूण बूथ निहाय मतदान केंद्राची पाहणी  करून त्यांचा आढावा घेतला आहे. 
               
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक( प्रशासकीय) प्रवीण भगत, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदींच्या पथकाने विधानसभा - १८८ मतदार संघातील २१ केंद्रे व ७८ मतदान बूथ त्याचप्रमाणे विधानसभा - १९० येथील १९ केंद्रे व ४७ मतदान बूथ असे एकूण लोकसभा मावळ - ३३ ची ४० केंद्रे व १२५ मतदान बूथ यांची पाहणी गेल्या चार दिवसापासून करण्यात आली आहे. त्यादृष्टीने तेथील सुरक्षितता त्या गाव परिसरातील लोकवस्ती त्यातील गुन्हेगार आदी बाबींचा आढावा या पाहणी दौऱ्यात घेण्यात आला आहे. 
Comments