आचारसहिंतेचे काटेकोरपणे पालन करून मतदान शांततेत पार पडावे यासाठी पनवेल तालुका पोलिसांचे रूटमार्च..
        पनवेल तालुका पोलिसांचे रूटमार्च..


पनवेल दि.०३(संजय कदम): आगामी लोकसभा निवडणुकीसाच्या आदर्श आचारसहिंतेचे काटेकोरपणे पालन करून मतदान शांततेत पार पडावे यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. 
लोकसभा निवडणुक 2024 चे अनुषंगाने आणि वरीष्ठांच्या आदेशान्वये पनवेल तालुका पोलीस ठाण्याला 01 आरपीएफ कंपनी पुरविण्यात आली होती. आरपीएफ कंपनीमध्ये 2 अधिकारी, 30 अंमलदार यांचा समावेश होता. त्यांच्यासह पोलीस ठाणे कडील 2 पोनि, 07 सपोनि-पोउपनि व 30 पोलीस अंमलदार व झोन 2 स्ट्रायकींग वरील 01 अधिकारी, 13 अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, हिंदू-मुस्लिम मिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील  कोन गाव परिसर  व भिंगारवाडी गाव परिसर या ठिकाणी पायी भेट दिली. तसेच कोन गावं ते भिंगारवाडी गावं दरम्यान येणारी आजीवली, भातान, शेड्युग फाटा, भिंगार गावं, शेड्यूग टोल नाका, या गावांना धावती भेट देवून गाव परीसर व तेथील परीस्थितीची माहिती देण्यात आली.



फोटो : पनवेल तालुका पोलिसांचे रूट मार्च
Comments