मी कसा घडलो व सर्वांना कस घडविले या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार..
 पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार

पनवेल : -  मी कसा घडलो व सर्वांना कसे घडविले या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रोहा येथील मातोश्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. स‌माजातील गोरगरिब अभ्यासू मुलांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, या दृष्टिकोनातून या पुस्तकाचे प्रकाशन डिवाईन संस्कार रिसर्च फांऊडेशन या ट्रस्ट ने केले. गरिबीतून शिक्षण घेऊन कै कृष्णराव मो. गडमुळे यांनी स्वतः ला एक आदर्श शिक्षक घडविले, आपल्या पत्नी व मुलांना शिक्षण व संस्कारांनी उच्च शिक्षित केले. पत्नी मंगला कृ गडमुळे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 2005 साली राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचे सर्व श्रेय कै. कृष्णराव मो. गडमुळे यांना जात.
       जेष्ठ कन्या बीके डॉ. शुभदा नील प्रसिद्ध स्त्री रोग, कॅन्सर व गर्भ संस्कार तज्ञ असून ती भारत भर समाज कल्याणासाठी कार्यक्रम करत असते. ती पनवेल येथील नील हॉस्पिटलची संचालीका आहे.
रोहा येथील जेष्ठ शिक्षक, वकील, नगरसेवक, डॉक्टर, अनेक मान्यवर, ब्रह्माकुमारीज संस्था पनवेलच्या संचालिका तारा दिदी रोहा केंद्राच्या मंदा दिदी, अलिबाग केंद्राच्या भारती दिदी, प्रो. इ. वि. गिरीष, बीके डॉ शुभदा नील, मंगला गडमुळे, नील, वेदक, गडमुळे परिवार, ब्रह्माकुमारीज परिवार व 500 हुन अधिक रोहेकर या क्रार्यक्रमास उपस्थित होते.
Comments