पनवेल इंडस्ट्रीयल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी ; लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास...
पनवेल वैभव / दि.२६(संजय कदम): पनवेल जवळील पनवेल इंडस्ट्रीयल को ऑ. इस्टेट लिमीटेड परिसरात दोन ठिकाणी अज्ञात चोरटयाने केलेल्या घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
येथील हॉलमार्क मोटर लिंकस् एल.एल.पी., (रॉयल इनफील्ड), प्लॉट नंबर १०१. पनवेल इंडस्ट्रीयल को ऑ. इस्टेट लिमीटेड या ठिकाणच्या शोरुमच्या मागील जीन्याचे दरवाजाने अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करुन लिनोव्हा कंपनीया लॅपटॉप, नोकीया कंपनीचा मोबाईल फोन, जीवो कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा मिळून एकुण १ लाख ८१ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत विशाल हुडाई वर्कशॉपमध्ये चोरी करून त्या ठिकाणाहून २ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेची निंद्य पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.