पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई ; ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट..
७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट..


पनवेल वैभव / दि.०६ (संजय कदम) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त मिलीद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय वेनपुरे, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अवैध धंदयावर कारवाई करत ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु नष्ट केली.  

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि (प्रशा) प्रविण भगत, पोउपनि अभयसिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार है अवैध धंदयावरील कारवाईकामी पोलीस ठाणे ह‌द्दीत गस्त करित असताना कुंदेवाहळ गावच्या ह‌द्दीतील जंगलात रोशन वास्कर हा दारु विक्रीसाठी माळण्याचा व बनिवण्याचा धंदा करीत असल्याचे माहित पडले. या अनुषंगाने पंचासह जावून सदर ठिकाणी छापा टाकला असता २५० लिटरचे २२ प्लास्टीकचे पूर्ण भरलेले बैरल मध्ये एकूण १,१०,०००/- रु किमतीचे ७५०० लिटर कच्च्या दारुचे नवसागर द्वव्य तसेच दारु बनविण्यासाठी लागणारे खालील प्रमाणे साहित्य मिळून आले. 
यामध्ये किती आरोपींचा सहभाग आहे याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे मार्फत अधिक तपास सुरु आहे.



फोटो : पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई करून ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट
Comments