जुगार अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांची कारवाई...
पनवेल दि. १७ ( संजय कदम ) : पनवेल शहरात सुरु असलेल्या ऑनलाइन स्कील गेम च्या नावाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे .
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वडघर खाडी पूल येथे असणाऱ्या ऑनलाइन स्किल गेम या नावाखाली आकडे लावून जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्याने बनावट ग्राहक व दोन पंच यांच्यासह सापळा रचून कारवाई केली असता सदर ठिकाणी ऑनलाइन स्किल गेम च्या नावाखाली आकडे लावून जुगार खेळत असल्याबाबत खात्री झाल्याने सदर स्किल गेम या दुकानाचे मालक व चालक यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात लॉटरी रेगुलेशन ॲक्ट7 (3) ,9(1)जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(1),(अ)5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्या ठिकाणाहून 1. 31,300 - रु किमतीचे ऑनलाइन गेमिंग करता असणारे संगणक साहित्य व रोख रक्कम 13,900/- मिळून आल्याने ते साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई सपोनी प्रकाश पवार,पो हवा अमोल पाटील, पो हवा सुधीर पाटील, पोना मिथुन भोसले,पो कॉ विशाल दुधे,पो कॉ अभिजीत गडकरी आदींच्या पथकांनी केली आहे .