कामोठे परिसरातील वाहन चालकांना वाहतूक शाखेेने दिले सुुरक्षिततेचे धडे...
पनवेल वैभव / दि.16 (संजय कदम) ः कामोठे परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांवरील चालकांना वाहतूक शाखेतर्फे सुरक्षिततेचे धडे देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहन चालकाने डोक्यात हेल्मेट घालावे, दुचाकीवरुन दोघा जणांनी प्रवास करावा, वाहतुकीचे नियम पाळावे, त्याचप्रमाणे चार चाकी वाहन चालकांनी सिट बेल्ट लावावा, वाहनांवर नियंत्रण ठेवावे आदी प्रकारचे प्रबोधन व सुरक्षिततेचे धडे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश भादरे व त्यांच्या सहकार्यांनी दिले. या उपक्रमाचे कामोठे वासियांनी स्वागत केले असून वाहतुकीचे नियम पाळण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
फोटो ः कामोठे वाहतूक शाखा