सर्वांनी एकत्र येऊन पंकजाताईंच्या विजयाचे शिलेदार होऊया : खासदार प्रितमताई मुंडे
कळंबोली येथील जाहीर सभेत खासदार प्रितमताई मुंडे यांनी केले पंकजाताईं मुंडे यांना विजयी करण्याचे समस्त बिडकरांना आवाहन
विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला हवी - प्रितम मुंडे
पनवेल वैभव वृत्तसेवा :- 
निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी असे विधान पनवेल मधील कळंबोली येथे भाजपा खासदार प्रितम ताई मुंडे या त्यांच्या भगिनी माजी आमदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी आल्या असताना त्यांनी केले यावेळी मंचावर आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा नेते बाळासाहेब पाटील व समस्त बीड कर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की पंकजाताई यांच्याकडे आपण संघर्षाचे प्रतीक म्हणून आपण पाहतो तोच आपला नेता जगातला संयमाचा मूर्तिमंत उदाहरण आहे. कितीही संघर्ष जरी आयुष्यात आला तरी अतिशय संयमाने शांतपणे सर्वांचा सन्मान करत ताई आपले विचार मांडत असतात. आशा आदर्श नेत्याला आपण मतदान करा, तुम्ही दोन वेळा मला मतदान केले आता यावेळी तुम्ही प्रथमच पंकजाताईना मतदान करणार आहात. 

आपण सर्व समावेशक विकासाचे राजकारण करणाऱ्याला माणसाला जिल्ह्याची सूत्रे द्यायची आहेत. संकटकाळी आपण नेहमी आमच्या बरोबर राहिलात, यावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंकजाताईंच्या विजयाचे शिलेदार होऊया अशाप्रकारे समस्त कळंबोलीकर बीड वासीयांना खासदार प्रीतमताई मुंडे यांनी साद घातली.
Comments