संजोग वाघेरे पाटील यांनी केले जनार्दन भगत साहेब यांना विनम्र अभिवादन..
संजोग वाघेरे पाटील यांनी केले जनार्दन भगत साहेब यांना विनम्र अभिवादन...

पनवेल / प्रतिनिधी.
         शेतकरी कामगार पक्षाचे आदर्श नेते स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्य आणि विचारधारेशी अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहिलेले सच्चे जननायक असणाऱ्या स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांना यावेळी ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी विनम्र अभिवादन केले.
        संजोग वाघेरे पाटील यांच्या समवेत यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप नेते तथा सुप्रसिद्ध उद्योगपती जे एम म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य आर सी घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत यावेळी उपस्थित होते.
Comments