शनिवार २५ मे रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन ...
शनिवार २५ मे रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन ...



पनवेल / प्रतिनिधी -  : ए बी एन टेक्नॉलॉजी, महामना मालवीय मिशन मुंबई आणि इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार दि. 25 मे रोजी व्ही के हायस्कूल, पनवेल येथे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यावेळी मोफत कर्करोग चिकित्सा व उपचार, मोफत नेत्र तपासणी, ईसीजी आणि शस्त्रक्रिया मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार आदी मोफत केले जाणार आहेत.
       कर्करोगाचा लवकर शोध घेणे महत्वाचे आहे. बऱ्याचदा, कॅन्सरसह अनेक रोग उशिरा अवस्थेत आढळतात, त्यामुळे उपचार आणि परिणामांमध्ये तडजोड होते. हे सर्व जागरुकतेच्या आभावामुळे होते, या शिबीरात समाविष्ट होऊ शकणाऱ्या विविध आजारांची तपासणी आणि उपचार हे उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने होतील. या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments