संघटनेच्या राष्ट्रीय मंत्र्यांनी दिले उद्धव ठाकरे यांना पाठिंबाचे पत्र ...
पनवेल / वार्ताहर : -
देशभरातील सुवर्णकारांची हक्काची समजली जाणारी राष्ट्रीय स्वर्णकार राजनैतिक भागीदारी मंच या संघटनेने रविवार दिनांक १२ मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तमाम उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. संघटनेच्या राष्ट्रीय मंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लेखी निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा देत असल्याचे कळविले. तसेच देशभरातील तमाम सुवर्णकार बंधूंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
१८ व्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या चरणाचे मतदान उद्या सोमवार दिनांक १३ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वर्णकार राजनीतिक भागीदारी मंचने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे त्याचा सोमवारी तसेच त्या पुढील होणाऱ्या मतदानावरती अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मतदारसंघात स्वर्णकार समाजाची फार मोठी लोकसंख्या आहे. समाजातील विविध जाती धर्म पंथ हे सारे संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी यापूर्वी होतेच. त्यातच आता त्यांच्या पाठी मतदारसंघातील सुवर्णकार बांधवांची शक्ती वाढल्यामुळे त्यांचे पारडे पुन्हा एकदा जड झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
दोन परिवारांच्या मनोमिलनाचा सगळ्यात पहिला दागिना म्हणजे साखरपुड्याची अंगठी ते नववधूचे मंगळसूत्र हे सुवर्णकार बांधवांच्या कारागारी शिवाय पूर्णच होत नाही. लहान मुलांच्या जन्मानंतर पाचवीला लागणाऱ्या दागिन्यापासून ते अंत्यविधीपर्यंत लागणारी सारी आभूषणे हा समाज घडविण्याची सेवा करत असतो. सुवर्णकार बांधवांच्या कार्यागरी शिवाय स्त्रीचा सोळा शृंगार पूर्ण होत नाही. देव देवतांच्या आभूषणांना घडविण्याची जबाबदारी देखील याच समाजावर असते. समाज व्यवस्थेमधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जाणारा सुवर्णकार बांधव आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे पत्र उद्धव ठाकरे साहेबांना देण्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी विसपुते यांच्या स्वाक्षरीचे पत्र उद्धव साहेबांना सुपूर्द करण्यात आले.
परिश्रमवादी, सुशिक्षित, आणि समजदार असणारा सुवर्णकार समाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल ही निशाणी आपली निशाणी मानून मतदान करणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय मंत्र्यांनी सांगितले.