भावना ऑटोमोबाईल्सच्या नवीन शाखेचे उदघाटन...
पनवेल / प्रतिनिधी - : नवी मुंबई वाशी येथे कार अँड बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईस भावना ऑटोमोबाईल्स या नवीन शाखेचे भावना ग्रुपचे सर्वेसर्वा अपर्णा शाह आणि राजेश शहा यांच्या हस्ते उदघाटन झाले.
यावेळी मोहोमद तूरा (सीईओ महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्स लिमिटेड), जय रूंगता (बिझनेस हेड रिटेल्स), विशाल शर्मा ( आरएसएम मुंबई आरओ), जयंत म्हात्रे (झोनल हेड एक्स मार्ट एम अँड एम), अमित गोखले (डीएम, एमएफएल), सुशील सुधाकरण मॅनेजर एक्सचेंज मुंबई आरओ एमएफसीडब्ल्यूएल), कार अँड बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या उदघाटनास विशेष अथिति म्हणून उपस्थित होते. कंपनीच्या एक्सक्लूसिव प्रीमियम नेटवर्क विस्तार करण्यासाठी भावना ऑटोमोबाएल्सने वाशीमध्ये लक्ष्य केंद्रित केले आहे. जेणेकरुण ग्राहकांना उत्तम सुविधा व आनंदही देता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.