संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
पनवेल वैभव / दि.13 (संजय कदम) ः पनवेल शहरातील जुने कोर्ट परिसर येथे पनवेल तालुका विधी सेवा समिती, वकील संघटना, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य म्हणून वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला.
पनवेल तालुका विधी सेवा समिती, अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी आपल्या मनोगतात निसर्गाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी आहे व यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची जपणूक केली पाहिजे अशा आशयाचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ , खजिनदार अॅड. धनराज तोकडे , ऑडिटर - अॅड. विशाल मुंडकर , कार्यकारणी सदस्या - अॅड. प्रगती माळी , कार्यकारिणी सदस्य - अॅड. भूषण म्हात्रे , पॅनल अॅड. इंद्रजीत भोसले, पॅनल अॅड. मनीषा गायकर, पॅनल अॅड. मनीषा गावंडे , पॅनल अॅड. नागेश हिरवे, रिटेनर अॅड. स्वाती सोनवणे , रिटेनर अॅड. सुयश कामेरकर , कनिष्ठ लिपिक - अविनाश चंदने आणि पी.एल.व्ही. शैलेश कोंडसकर उपस्थित होते. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास पनवेल येथील निसर्ग मित्र संस्थेचे सभासद धनंजय मदन, किशोर म्हात्रे, सुरेश रिसबुड, विजय कोल्हे, संजय कुमठेकर, प्रवीण देशपांडे, आबा गोडबोले, धनंजय पाटील, शेखर तरे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले.
फोटो ः वकील संघटना वृक्षारोपण