जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामदेव गोंधळी यांचे एक दिवसीय लक्षवेधी उपोषण...
खरेदी खतात फसवणूक झाल्याचा नामदेव गोंधळी यांचा आरोप


पनवेल दि. १५ प्रतिनिधी
मौजे वावंजे ता पनवेल येथील सर्वे नंबर १२३ /२  येथील जमीन नामदेव गोंधळी यांनी सन २०२०  मध्ये विक्री केली होती मात्र प्रत्यक्षात एका बाजूची जागा विक्री केली होती मात्र जागा घेणारे यांनी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्याच सर्वे नंबर ची दुसरी बाजूची जागा घेतली असल्याचे उघडकीस आले असल्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नामदेव गोंधळी  यांनी अनेक वेळा  तहसिदार पनवेल,  प्रांत अधिकारी पनवेल यांच्यासमोर करून देखील काहीही हालचाल होत नाही म्हणून गुरुवारी 13 /06/2024  रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळण्याची  गोंधळी यांनी मागणी केली आहे.

नामदेव गोंधळी गेली अनेक वर्षे आपली फसवणूक झाली असल्याने शासन दरबारी हेलपाटे मारत आहेत , संविधानिक मार्गाने उपोषण निवेदन देऊन आपल्याला न्याय मिळावा यासाठी   शासनाकडे मागणी करीत आहेत  याबाबत पनवेल मध्ये अनेक वेळा  उपोषण देखील केले होते .
मौजे वावंजे ता पनवेल येथील सर्वे नंबर १२३ /२ जमीन सन २०२० मध्ये विक्री व्यवहार  ठरला  होता या सर्वे नंबर मध्ये आकार फोड करताना बेकायदेशीर बदल केली आहे तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट दिल्याने माझी फसवणूक झाली असल्याने मला न्याय मिळावाअशी मागणी नामदेव गोंधळी यांनी  गुरवार दिनांक १३ जून २०२४ रोजी  एक दिवसीय लक्षवेधी उपोषणाच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी यांचे कडे  केली आहे . 
Comments