केंद्र सरकारने घरांच्या किमतीवर अंकुश ठेवून करामध्ये सूट देण्याची आवश्यकता - अशोक छाजेर, सुपरस्ट्रक्चर्स - नवी मुंबई.
      अशोक छाजेर, सुपरस्ट्रक्चर्स - नवी मुंबई.


पनवेल ( प्रतिनिधी )
केंद्रातील विद्यमान सरकार व्यावसायिक समूहांना या टर्म मध्ये भरघोस सहकार्य करेल, विशेष करून मध्यम लघु सूक्ष्म अतिसूक्ष्म यांना सहकार्य राहील कारण गेल्या दहा वर्षात या कॅटेगरीमधील व्यावसायिक कठोर परिश्रम करत आहेत व त्यांना सरकारकडून सहकार्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रीया अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स, नवी मुंबई चे चेअरमन अशोक छाजेर यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचा व्यवसाय सुलभते वरती विशेष भर असेल. औद्योगिक क्षेत्रात वाढ होईल आणि पायाभूत सुविधांचा मोठा विकास होईल या व्यतिरिक्त अभिनव असा नदी जोड उपक्रम देखील अबाधित राहील अशी आशा आहे. 

जागतिक पातळीवर सर्वच स्तरांवर देशाची भरभराट होत राहील. त्यामुळे देशांतर्गत कॉर्पोरेट सेक्टर विशेष प्रगती करेल. याचाच परिणाम म्हणून रियल इस्टेट व्यवसाय तेजीत असणार आहे. सर्वत्र रियल इस्टेट व्यवसाय तेजीत राहील आणि तिथे वाढती मागणी असेल. म्हणूनच विद्यमान सरकारने किमतींवरती अंकुश ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तसेच करांमध्ये शिथिलता द्यावी लागेल जेणेकरून रियल इस्टेट इंडस्ट्री मधले निर्माण मूल्य वाढणार नाही अशी आमची या नव्या सरकारकडून अपेक्षा असणार असल्याचे अशोक छाजेर यांनी सांगीतले.
Comments