महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पनवेल तालुक्याच्यावतीने गुणगौरव व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
गुणगौरव व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
पनवेल, दि. १० (वार्ताहर) :   महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पनवेल तालुक्याच्यावतीने पनवेलमध्ये समाजातील विद्यार्थाचा गुणगौरव समारंभ व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पनवेल शहरातील टपाल नाका येथील शनी मंदिरात झालेल्या या समारंभासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडीक,रायगड जिल्हा महिला अध्यक्ष संज्योत चाळेकर,पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे तसेच समाज बांधव व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. समाजातील १० व १२ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत मान्यवरांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडीक म्हणाले, समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल तालुका अध्यक्ष सुनील खळदे यांचे कौतुक करून समाजातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा आपल्या गुणवत्तेसाठी उपयोग करावा असे सांगितले.पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे यांनी आपल्या भाषणात,जगनाडे महाराज सुदुंबरे येथे धार्मिक यात्रा, महिलांसाठी हळदीकुंकू, समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम हे समाजासाठी उपक्रम राबवले जात असून समाज एकतेसाठी समाजाने एकत्र यावे अशी आवाहन सुनील खळदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम किरवे यांनी केले तर आभार प्रवीण धोत्रे यांनी मानले.  


फोटो  :  मोफत वह्या वाटप
Comments