पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लावण्यात आली फलके...
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः नुकताच पावसाळा सुरू झाल्याने वर्षा सहलीसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबई व उपनगरे परिसरातून नागरिक येत असतात. परंतु येथील वातावरण व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज त्यांना येत नसल्याने अनेकांचे नाहक जीव जातात. हे जीव वाचविण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणारी फलके उभारली आहेत. व त्यातून महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने नदी पात्रात जाणे अत्यंत धोकादायक आहे, नदी पात्रामध्ये बर्याच ठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजुन येत नाहीत. आपण आलेले परिसरात पाऊस नसला तरी, माथेरान येथे पाऊस झाल्यास पाण्याचे प्रवाहामध्ये अचानक पणे मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजुन येत नसल्याने काही लोकांचा यापुर्वी सदर नदीपात्रात बुडून मृत्यू होवुन बर्याच दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत दक्षता घ्यावी., लहान मुले, स्त्रीया व ज्या लोकांना पोहता येत नाही. त्या लोकांनी पाण्यात उतरू नये., गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असतो, त्यामुळे सदर नदीपात्रात उतरून अगर कोणतेही पदार्थ अथवा वस्तु टाकून पाणी दुषित करू नये., सदर परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहे. व सदर परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल., सदरचा परिसर हा डोंगरळ असुन रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, अँम्ब्युलन्स यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता खुला रहावा, यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तर्हेने रस्त्याचे कडेला वाहने उभी करू नयेत, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तर्हेने उभे करण्यात आलेले वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल., सदर परिसरात वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादीत ठेवावा, तसेच नशा करून वाहन चालवु नये तसे आढळुन आल्यास तात्काळ कायदेशिर कारवाई करण्यात येईल., सदर परिसरातील वरीलप्रमाणे धोक्याचे अनुषंगाने जनतेच्या जिवीताची व सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेवुन सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाढेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोर्बे धरण, कुंडी धबधबा (अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा) हरिग्राम नदीपात्र, धोदाणी नदीपात्र, चिंध्रण व मोहोदर नदीपात्र, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, या ठिकाणी भेटी देण्यास मनाई आदेश काढण्यात आल्याची माहिती वपोनि अनिल पाटील यांनी या फलकाद्वारे दिली आहे. त्याचप्रमाणे वरीलप्रमाणे कृती करताना कोणी आढळुन आल्यास तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क 98196791000/02227452444 तसेच डायल 112 यावर संपर्क साधुन माहिती द्यावी, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
Photo : फलके