युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम..
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम
पनवेल वैभव / दि.13 (संजय कदम) ः युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी कमळ गौरी शिक्षण संस्थेच्या वतीने घेतला होता.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी कमळ गौरी शिक्षण संस्थेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला तसेच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वर्गाने परिसरातील मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


फोटो ः गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण
Comments