डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड
           प्रदेश सरचिटणीस पदी निवड...
पनवेल  / प्रतिनिधी  - : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,लोकशाही भारत न्युजचे संपादक डॉ. मुनीर तांबोळी यांची शरदचंद्र पवार , सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र  प्रदेश सरचिटणीस तथा पिंपरी चिंचवड निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यावेळी पक्षाचे प्रवक्ते नसीम सिद्धिकी, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुलतान मालदार, संजोग वाघेरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मुनीर तांबोळी यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने या संधीचे नक्कीच सोने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया या वेळी डॉ.मुनीर तांबोळी यांनी दिली.त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Comments