शिवसेनेच्या प्रयत्नामुळे तळोजा एमआयडीसीत हॉस्पिटलसाठी भूखंड आरक्षित होणार..
शिवसेनेच्या प्रयत्नामुळे तळोजा एमआयडीसीत हॉस्पिटलसाठी भूखंड आरक्षित होणार..

पनवेल, दि. २६(वार्ताहर)सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र असलेल्या तळोजा औद्योगिक क्षेत्रांतर्गत सुमारे ५५६ वेगवेगळ्या क्षेत्रातील औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. सर्व कंपन्यांमध्ये मिळून साधारण दोन लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. भविष्यात या संख्येत अधिक वाढ होईल यात शंका नाही.
परंतु अतिशय झपाट्याने विस्तारत चाललेल्या या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांसाठी सद्यस्थितीत एकही हक्काचे हॉस्पिटल नाही व त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालय गाठावे लागते. अशी खंत तळोजा एमआयडीसी CETP चेअरमन श्री अभिजीत शिंदे यांनी पनवेल उपमहागरप्रमुख श्री महेश सावंत व पनवेल शहर प्रमुख श्री प्रसाद सोनावणे यांच्याकडे बोलून दाखवली व तळोजा एमआयडीसी मध्ये आपल्या सरकारमधून हॉस्पिटल करिता एखादा भूखंड आरक्षित करून द्यावा अशी विनंती केली.
सदर मागणीची दखल घेत महेश सावंत व प्रसाद सोनावणे यांनी त्वरित महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तळोजा एमआयडीसी येथे हॉस्पिटलसाठी भूखंड आरक्षित करून द्यावा अशी मागणी केली व उद्योग मंत्री यांनी देखील लगेचच MIDC चे CEO यांना फोन करून सदर बाबीची पडताळणी करून लवकरात लवकर भूखंड आरक्षित करून द्यावा असे आदेश दिले. 
यासंदर्भात जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Comments