जिगरबाज कै.प्रशांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत वाहिली शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी श्रद्धांजली..
शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी वाहिली श्रद्धांजली..


पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः जिगरबाज कै.प्रशांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, प्रशांत आम्हाला सोडून गेलास असे कदापि वाटणार नाही तुझे तन मन आमच्या कडे कायम स्वरूपात असेल तुझ्या जाण्याने अतोनात नुकसान झालेलं आहे ते कदापि भरुन न येणारे आहेत. तुझ्या संघर्षाची आम्हाला कायम आठवण राहणार आहे. मी जेव्हा उरण ला शिवसेना शाखेत बुलेट (मोटरसाइकिल) वरुन येत होतो तेव्हा शाखा प्रमुख कै. रमेश भोईर यांच्या बरोबर तू धावत होतास हे मी विसरलो नाही तुझी ती होणारी धावपळ एवढ्या लहान वया मध्ये तू करीत असलेली धडपड मला अजूनही आठवते तेव्हा मला तुझे फार कोतुक वाटायचे असा हा प्रशांत एवढा मोठा जिगरबाज, संघर्षमय, योद्धा, परखर बोलणारा कधी झाला समजलेच नाही परंतु त्या उरण भागा मध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारांची शिवसेना तू संघर्षमय पधतीने वाढवलीस तिथे शेतकरी कामकरी पक्षाचे दादागिरीचे राजकारण असताना, प्रशांत तू तिथे शेतकरी कामकरी पक्षांचा रणरागिणी कै. मीनाक्षिताई पाटील यांच्या विरुद्ध तू शिवसेना च्या वतीने समर्पक लढा दिलास हे खरोखर तुझे आश्‍चर्य आणि कौतुकास्पद वाटले या नंतर तू कधी मागे वळून पाहिले नाहीस. तू शिवसेनेच्या रायगड जिल्ला प्रमुख झालास त्या मधे सुद्धा तू चांगले काम करीत होतास परंतु तुला चमचेगिरी आणि हुझरेगिरी जमली नाही त्या मुळे तुला गणेश नाईक यांच्या कडे जाव लागल तिथे सुद्धा तू स्वाभिमानाने आणि मनाने त्यांचा बरोबर काम केलंस तुला त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये जाव लागल परंतु तू स्वयंभू आणि कर्तुत्व असल्या मुळे तिथे तुझी घुसमट होतं होती त्या मुळे गणेश नाईक भाजप मध्ये गेले परंतु तू त्यांच्या बरोबर गेला नाही आणि तू राष्ट्रवादी कांग्रेस मध्येच राहिला आणि त्यांच्या विरूद्ध राष्ट्रवादी कांग्रेस च नेतृत्व केलस मुंबईच्या शिवसेनेच्या भल्याभल्या नेत्याना गणेश नाईकांच्य विरोधात नवी मुंबई मध्ये काम करता आले नाही पण ते काम राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने प्रस्तापित साम्राज्याला तू हादरा दिलास हे खरोखर कोतुकास्पद आहे
आम्ही ते आश्‍चर्याने पाहत होतो आणि तुझ्या त्या कामगिरी बाबत सातत्त्याने रात्री फोन वर बोलत होतो मलाच प्रश्‍न पडत होता तू नक्की काय करतोय त्या नंतर राष्ट्रवादी फुटली शरद पवारांना सोडून बरेच लोक गेले परंतु तू आपल्नी निष्ठा जपण्या साठी शरद पवारां बरोबरच राहिलास. तुझा हा निर्णय कौतुकास्पद होता. तुझे मोठे होण्याचे स्वप्न होत ते तू नक्की केले आहेस आणि ते पुरे करण्यासाठी तुझी वाट चालेली होती त्या प्रमाणे तू महाविकास आघाडी मध्ये जुन्या जाणत्या इतर पक्षांच्या नेत्यांना सुद्धा आक्रमक पणा मुळे गप्प बसावे लागत होते ते तुझ्या ठाम भूमिके मुळे त्याना माघार घ्यावी लागत असे हे दिसून आलेले होते या बाबतीत अनेक राजकीय नेत्यांनी या तुझ्या भुमिकेचे कोतुक केले आणि या पुढील त्यांच्या लढ्या मध्ये तुझ्या अस्तित्वाची जाणीव होणार. तुझ्या शोक सभे मध्ये झालेली प्रचंड गर्दी सर्वपक्षानी केलेली आषणे तुझ्या कार्याचा प्रभाव पाडून गेली. तू जनमानसात लढलास तुझा हेवा वाटवा अस तुझ कर्तृत्व सिद्ध केल आहेस. तुझ्या घरी जगात सर्वश्रेष्ट राजकारणी म्हणून गणले जातात असे मा. शरद पवार आणि त्यांचे कुटूंब तुझ्या घरी आले यातच तू खरा जिंकलास तू जिगरबाज आहेस हे सिद्ध केलेस. प्रशांत तू उरण पनवेल भागाला दुःखाच्या छायेत सोडून गेला आणि आम्हाला पोरखे केलेस याची जाणीव आम्हाला कायम स्वरुपात राहिल. 


फोटो ः प्रशांत पाटील
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image