पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
   पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई
पनवेल वैभव, दि.22 (संजय कदम) ः पनवेल शहर परिसरात दोन चर्चमध्ये झालेले दोन चोरीचे गुन्हे पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणले आहेत व याप्रकरणी दोन नेपाळी सराईत चोरट्यांना अटक केली आहे.
शहरातील ओरियन मॉलच्या मागे असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर चर्च येथे झालेल्या चोरीमध्ये तेथील दानपेटी फोडून अंदाजे रु.50 हजार रुपये रोख चोरुन नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे शहरातील लाईन आळी येथील सेंट फ्रान्सिस न्यू चर्च येथेही चर्चच्या पाठीमागील दरवाजा तोडून तेथील कपाटात असलेल्या दान पेटीमधील रोख रक्कम 5 हजार रुपये चोरुन नेण्यात आले होते. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पो.हवा.नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो.ना.विनोद देशमुख आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे व तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत आरोपी अग्र धनबहाद्दुर बिष्ट उर्फ पवन (38 रा.तळोजा गाव) व धनबिरे राहुले विसुक्रमा (31 रा.तळोजा गाव) या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक तपासात हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत. यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली आहे.


फोटो ः अटक आरोपी
Comments