शेवरलेट कंपनीच्या जिंटो गाडीला लागली अचानक आग..
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल जवळील मुंबई-पुणे महामार्गावर पुणे लेनवर 01.700 की.मी.येथे मध्यरात्रीच्या सुमारास शेवरलेट कंपनीच्या जिंटो गाडीला अचानकपणे आग लागली असून गाडीतील दोघे जण सुखरुप आहेत.
शेवरलेट कंपनीची जिंटो कार नंबर एमएच 02 बीटी 7432 हीला अचानक आग लागली. सदर कार मधील चालक हरी ओम मिश्रा वय - 23 वर्ष व त्याच्यासोबत असलेले रणवीर सिंग, वय -22 वर्ष, दोघे राहणार- भांडुप, मुंबई हे मुंबई ते बेंगलोर जात असताना त्यांच्या ताब्यातील कारला अचानक आग लागली आहे. घटनेमध्ये चालक व सहप्रवासी सुखरूप असून कार संपूर्ण जळाली आहे.
सदर आग फायर ब्रिगेड कळंबोली व आय आर बी फायर ब्रिगेड यांच्या मदतीने विझविण्यात आली आहे. सदर कार रस्त्याच्या बाजूला शोल्डर लेनला घेण्यात आली असून पाठीमागील बाजूस बॅरिगेट करण्यात आले व त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर ठिकाणी पो उप निरीक्षक नाईक व पळस्पे मोबाईल वरील पथक, खांदेश्वर पोलीस ठाणे कडील पो हवा / पाटील व पथक, आय आर बी फायर ब्रिगेड, डेल्टा स्टॉफ, देवदूत स्टॉफ, कळंबोली फायर ब्रिगेड स्टॉफ उपस्थित होते.
फोटो ः गाडीला लागलेली आग