स्वातंत्र्य महोत्सव अंतर्गत विचुंबेत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..
ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
पनवेल/प्रतिनिधी - : भारतीय स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय "स्वातंत्र्याचा उत्सव"दि. ९ ते १७ ऑगस्ट, २०२४ या कालावधीमध्ये राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत आबालवृद्ध आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली.लहान मुलांचा आणि मुलींचा प्रत्येकी एक गट तर महिला आणि पुरूषांसाठी चा खुला गट असे गटांचे विभाजन करण्यात आले.लहान मुलांच्या गटात अर्णव साळवी याने प्रथम तर गणेश पवार आणि यज्ञेश म्हात्रे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.मुलींच्या गटात संध्या यादव हिने प्रथम,मनस्वी काशीद हिने द्वितीय तर कशिष जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला.पुरुषांच्या खुल्या गटात  सनी यादव याने प्रथम,राहुल मुर्मू याने द्वितीय तर जयदीप पतंगे याने तृतीय क्रमांक पटकावला.महिलांच्या खुल्या गटात आदिती खेडेकर-साठे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर प्रतिक्षा साळवी यांनी द्वितीय तर सुनिता भारती यांनी तृतीय क्रमांक पटकावला.तर रोशनी साठे यांना वयाच्या 64 व्या वर्षांत देखील स्पर्धेत सहभाग नोंदवून ती पूर्ण केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना सरपंच प्रमोद भिंगारकर,उपसरपंच स्वाती पाटील,ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर, माजी सरपंच बळीराम पाटील , सदस्य आप्पा गायकवाड, अनिल भोईर, समीर दूंद्रेकर ,अतुल भोईर, आरती गायकवाड, विभूती सुरते, श्रावणी भोईर, सतीश म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक विनोद नाईक आणि टीमचे तसेच विचुंबे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असल्याचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी सांगितले.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image