आपली RPI ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे..
पनवेल / प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते पदाधिकारी नियुक्ती प्रमाण पत्र वितरण प्रशिक्षण शिबिर, कार्यकर्ता मार्गदशन शिबीर दि.११ऑगस्ट रोजी पनवेल येथील आंबेडकर भवन येथे पार पडले.यावेळी मोठया प्रमाणात आंबेडकरी जनता उपस्थित होती.
यावेळी बोलताना डॉ राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले की मला कॅडर बेस कार्यकर्ता हवा आहे, मी स्वतः कॅडर बेस आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रशिक्षण हे घ्यावेच लागेल, शिस्त ही असलीच पाहिजे,अर्ज भरण्यापासून ते शासकीय कामे कशा प्रकारे केली जातात या सर्वांचे शिक्षण येथे दिले जाणार आहे आणि ते प्रत्येकाला घ्यावेच लागेल.
त्याचप्रमाणे आपली (RPI) रिपब्लिकन पार्टी ही मूळ पार्टी आहे जी बाबासाहेबानी स्थापन केलेली आहे तीच पार्टी आपण देशभर घेऊन जायचे आहे.आपण संविधानासाठी रस्त्यावर नेहमी संघर्ष करतो,पण ते वाचवण्यासाठी आपली माणसे ही संसदेत बसली पाहिजेत संसदेत आपला आवाज घुमला पाहिजे,तेथून आपलं मते, आपल्या हक्काच्या मागण्या जनतेपर्यंत पोहोचवून मान्यकरून घेतल्या पाहिजेत.यावेळी अनुसूचित जाती जमातींच्या माध्यमातून २९ जागा लढवण्याचे संकेत डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी दिले.आज जरी इलेक्शन तरी विधानसभेला आमचे पाच तरी उमेदवार निवडून येणार , यावेळी त्यांनी कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे घोषित केले.
याप्रसंगी अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांना पद नियुक्त केलेले प्रमाणपत्र डॉ राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत मांडले.उपस्थितांमध्ये मुंबई महानगर अध्यक्ष तथा कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड,पनवेल महापालिका जिल्हाक्षेत्र अध्यक्ष किशोर गायकवाड,रायगड जिल्हाप्रमुख प्रवक्ता अमोल इंगोले,पनवेल महानगर जिल्हाक्षेत्र निवडणूक प्रक्रिया प्रमुख महादेव गमरे, कविता ताई गायकवाड,विद्याताई गायकवाड आदी पनवेल तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.