नवी मुंबई / प्रतिनिधी : -
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कळंबोली येथे स्थित व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटलतर्फे स्थानिक नागरिकांना सुपर स्पेशालिटी डॉक्टरांकडून मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रुग्णालयातील बारा उत्कृष्ट डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात मोफत सल्ला दिला.
या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ शेकडो लोकांनी घेतला असून हे प्रत्येक आठवड्याला दर रविवारी सायंकाळी "चार ते सात" वाजेपर्यंत चालू राहणार आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, ते या रुग्णालयाच्या सहकाऱ्यांची भेट घेऊ शकतात.
या संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. सदर पत्रकार परिषदेला रितेश बिजोरिया, सीईओ व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल आणि श्री. सुरेंद्र डांग, स्ट्रॅटेजिक सल्लागार यांनी संबोधित केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना रितेश बिजोरिया म्हणाले, "उच्चस्तरीय वैद्यकीय तपासणी, जी जागतिक दर्जाची आहे, तिचा लाभ सामान्य लोकांना मिळावा.हेल्थकेअर सेवांमध्ये पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे, जी आम्ही 'इलाज ईमानदारी से' या संकल्पनेसह सुरू केली आहे.
हे रुग्णालय जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान पद्धतीने बनवले आहे आणि हे माननीय पंतप्रधानांच्या 'हिल इन इंडिया' मिशनला सहाय्य देणार आहे, जेणेकरून इतर देशांमधून विदेशी रुग्ण देखील येथे येऊन उपचार घेऊ शकतील."सुरेंद्र डांग यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की, "आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजार, जसे की कॅन्सर, मधुमेह आणि मानसिक तणाव खूप वाढले आहेत. यासाठी व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल मोफत माहिती तसेच विश्वासार्ह उपचारांच्या संदर्भात सर्व माहिती सर्व रुग्णांसोबत शेअर करणार आहे. आम्हाला विश्वास आहे की हे रुग्णालय जागतिक दर्जाचे कॅन्सर ट्रीटमेंटचे केंद्र बनेल."
आगामी काळात विविध वैद्यकीय विभाग आणि उत्कृष्ट वैद्यकीय पद्धतीद्वारे हे रुग्णालय जगात लवकरच आपले नाव उजळणार आहे.गरीब रुग्णांच्या मनातील रुग्णालयाचे भय काढुन टाकण्यात व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल एक नवीन प्रकाश ठरणार आहे.सदर हॉस्पिटल हे कळंबोली, रोडपाली येथील पोलीस मुख्यालयासमोर स्थित आहे.