मुलगा कर्तृत्ववाने मोठा होणे वडिलांसाठी अभिमानास्पद - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः कोणत्याही वडिलांना आपला मुलगा आपल्यापेक्षा कर्तृत्वाने मोठा होणे ही अभिमानास्पद बाब असते असे कौतुकास्पद उदगार लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांनी काढले.ते आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवार आयोजित प्रभाग 19 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.प्रशांत ठाकूर,श्रीनंद पटवर्धन,भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,चिटणीस अमरिश मोकल,पनवेल शहर मंडल सरचिटणीस अमित वझे,माजी नगरसेवक अजय बहिरा,माजी उपमहापौर चारूशिला घरत,माजी नगरसेविका राजश्री वावेकर, मयुरेश खिस्मतराव,मनोहर गडगे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक आणि शहर उपाध्यक्ष केदार भगत हे उपस्थित होते.
यापुढे बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की,आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.त्यानिमित कार्यकर्त्यांना देखील विविध उपक्रमात राबवणे आणि सहभागी होण्याची संधी मिळते.केदार भगत सारखा कार्यकर्ता लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवेळेस विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो.त्याला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली हे कौतुकास्पद आहे.आ.प्रशांत ठाकूर यांच्या संगतीत आल्याने त्याच्या कार्याला आणखी गती आली आहे.केदार भगत यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे असे ते म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गीतांजली भगत,निकिता पाटील, सुमित दसवते,नितेश भगत,शेषनाथ गायकर,ब्रिजेश बहिरा, हर्षद गडगे,सचिन भगत,जयेश दसवते,रवी पारचे,संतोष वर्तले,यज्ञेश पाटील,फिरोज शेख,आनंद गायकवाड आदींनी प्रयत्न केले.
फोटो ः छत्री वाटप