नवनाथ नगर झोपडपट्टीच्या हक्कासाठी पनवेल शिवसेना मैदानात...
नवनाथ नगर झोपडपट्टीच्या हक्कासाठी पनवेल शिवसेना मैदानात... 
पनवेल : -  पनवेल येथील नवनाथ नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी नवनाथ महिला संघटने मार्फत 13/08/2024 रोजी पनवेल महानगरपालिके समोर आपल्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
त्यांची प्रमुख मागणी अशी होती की, ते गेले अनेक वर्ष याच भागात राहत असून पनवेल महानगरपालिकेतर्फे अनेक झोपडपट्टी धारकांना घर भाडेपट्टीची पावती दिली जात नाही, पनवेल महानगरपालिकेने घर भाडेपट्टीची पावती द्यावी यासाठी हे आंदोलन केले होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. कांबळे यांनी शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश  सोमण व शिवसेना पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे यांच्यामार्फत पनवेल महानगर पालिका उपायुक्त श्री. राजोळे यांच्या समोर आपले निवेदन दिले, चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.राजोळे यांना अश्वात केले केले की, नगरपरिषद असताना ज्या झोपडपट्टी धारकांना घर भाडेपट्टी साठी पावती येत होती त्यांना पुढील एक महिन्याच्या आता पनवेल महानगर पालिकेमार्फत घर भाडेपट्टीची पावती देण्यात येईल. सर्व आंदोलकांनी शिवसेना पनवेल महानगरपालिका महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व शिवसेना पनवेल महानगरपालिका संघटक मंगेश रानवडे यांचे आभार मानले व या पुढे देखील काही मदत लागली तर आम्ही नक्की करू असे आश्वासन शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश  सोमण व शिवसेना महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी दिले.
Comments