कायदेशीर गणरक्षक फौजच्या वतीने कारवाई करण्याची खांदेश्वर पोलिसांकडे मागणी...
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः कायदेशीर गणरक्षक फौज या संघटनेच्या माध्यमातून माळीवाडी सुकापुर या भागामध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या गुन्ह्याविरुद्ध व तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती आणि शीघ्र कार्यवाही करण्यात यावी, भविष्यात आता घडत असलेले गुन्हे घडू नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पालीदेवद - सुकापुर या विभागातील वाढत चाललेली लोकसंख्या चा विचार करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व या विभागामध्ये कायदा व सुव्यवस्था अटळ राहण्यासाठी या विभागामध्ये पोलीस चौकीची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांना निवेदन देण्यात आले. समाजात वाढत चाललेले गुन्हे व त्याला नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना या विषयावर पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर या विभागामध्ये पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला आहे.
फोटो ः निवेदन