भगवा सप्ताहाच्या अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप...
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः भगवा सप्ताह २०२४ च्या अनुषंगाने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पनवेल शहर शाखा पनवेल तर्फे पनवेल महानगर पालिका शाळा नं. 2 (दगडी शाळा ) येथे विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, भरत पाटील युवासेना सह सचिव अवचित राऊत, संदीप तांडेल, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, आयोजक व शहर प्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, सुनीत ठक्कर, अच्युत मनोरे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख रेवती सकपाळ, महानगर संघटक लीना गरड, विधानसभा संघटीका सुजाता कदम, तालुका संघटीका प्रमिला कुरघोडे, शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, त्रिवेदी, अश्विनी देसाई, सुजन मुसलोंडकर, राम जाधव, निखिल भगत, प्रशांत नरसाळे, नंदू घरत, मुकूंद म्हात्रे, संतोष तळेकर , अरुण ठाकूर, सचिन रणदिवे, प्रदीप माखिजा, बापू जोशी, प्रवीण धोत्रे, वेंकटेश मंजुळे, पवन मानकामे, बापू खैरनार, मुख्याध्यापक म्हात्रे सर, शिक्षकवर्ग आणि सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
कोट
शाळेतील कोणत्याही विद्यार्थी यांना काही मदत लागल्यास सर्वोतोपरी मदत करणार . ः शहरप्रमुख प्रवीण जाधव
फोटो ः शालेयपयोगी वस्तूंचे वाटप