कोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी धनराज नामदेव बडे बिनविरोध...
कोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी धनराज नामदेव बडे बिनविरोध... 
पनवेल वैभव : -  (राम बोरिले)
कोन ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यातील पनवेल पंचायत समितीमधील स्थानिक ग्रामीण संस्था असून सदर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी युवा नेतृत्व कर्तुत्वान व समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारे धनराज बडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच आश्विनी शिसवे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
बडे यांची उपसरपंच पदी कोन ग्रुप ग्रामपंचायत मध्ये निवड झाल्यानंतर आजिवली गावात मिरवणूक काढण्यात आली, ढोल ताशे व फटाके वाजवत स्वागत करण्यात आले, ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला,आई व आजोबा यांनी त्यांना आशीर्वाद दिले. गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, या निमित्ताने आनंदोत्सव साजरा झाला.
ग्रुप ग्रामपंचायत कोन चे उपसरपंच पदी 
धनराज नामदेव बडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या,
ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अश्विनी जितेश शिसवे, मा.उपसरपंच सविता कैलास म्हात्रे, सदस्य संजय जाधव ,दीपक म्हात्रे ,अक्षय म्हात्रे ,अस्मिता गायकर सदस्या, ताईबाई पाटील सदस्या, अंजली पाटील ,निकिता घरत मा. पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर धाडू बडे, दयावंती ज्ञानेश्वर बडे, मा.सरपंच मधुकर गायकर, मा. सरपंच परशुराम माळी, कोन ग्रुप ग्रामपंचायत चे ग्रामसेवक रमेश तारेकर,जितेश शिसवे, नितीन म्हात्रे, सुरज गायकर, आदेश घरत,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवलोली ग्रामपंचायतचे उपसरपंच देवेंद्र अनंत पाटील,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकृष्ण पाटील ,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सदस्य उपसरपंच धनराज नामदेव बडे यांच्या बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

तसेच आगरी कोळी कराडी संघटना चे अध्यक्ष रुपेश धुमाल, रुपेश पाटील व सर्व मित्र मंडळी उपस्थित होते, शिवसेना चे रायगड उप जिल्हा प्रमुख रामदास पाटील सहकार्यकर्ते उपस्थित होते,लायन ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बाळू शेठ फडके,यांच्यासोबत चा मित्र परिवारही उपस्थित होता. माजी सरपंच बालाराम शिसवे गोविंद पाटील शेकापक्ष चे कैलास म्हात्रे 
उद्योजक नवी मुंबईचे राजेश शिंदे  ,योगेश पाटील ,विशाल पाटील ,अमित गायकर ,सचिन गायकर, विश्वनाथ सर्देकर ,शेकाप कार्यकर्ता वैभव सारडेकर,मंगेश शेडगे,उद्योजक प्रियांक माळी, अरविंद माळी,काशिनाथ माळी, प्रदीप शेळके, अनिकेत कामरे, देवेश महादेव आशिष भोईर, प्रकाश महादेव ,कोपरखैरणे शिवसेना चे शाखाप्रमुख सिद्धेश राऊत,आनंद पाटील, शंभू शिसवे अक्षय गत्तारे कर्मचारी कोन ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच
धनराज नामदेव बडे यांनी यांचे आभार मानले. मी सर्व मतदार बंधू भगिनी यांनी मतदान केले त्यांचेही आभार मानतो आणि पाण्याच्या प्रश्न हा ६०% टक्के पूर्ण झालेला आहे व जनतेचे विविध प्रलंबित प्रश्न असतील ते ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावू असे जनतेला यावेळी त्यांनी आश्वासित केले.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image