स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतली प्राचार्य गणेश ठाकूर यांची भेट..
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महात्मा फुले एएससी कॉलेज पनवेल यांचे प्राचार्य गणेश ठाकूर यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेशावेळी येणार्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली.
त्याचप्रमाणे ए एस सी कॉलेज जवळ असलेल्या रेल्वे फाटकाच्या अडचणीच्या विषयी लवकरच संबंधित पीडब्ल्यूडी व रेल्वेच्या अधिकार्यांशी चर्चा करणार आहे व तो प्रश्न मार्गी लावणार आहे असे आश्वासन त्यांनी प्राचार्य गणेश ठाकूर यांना दिले. प्राचार्य गणेश ठाकूर यांनी महेश साळुंखे यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
फोटो ः गणेश ठाकूर यांची भेट