आरोपीना भर चौकात फाशी द्या - मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील
शरियत सारखा बळकट व सक्षम कायदा करा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, शक्ती कायदा अमलात आणा...

पनवेल /प्रतिनिधी
उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख ,नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हत्याकांडातील आरोपीना भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून महिलांवर अत्याचार करण्याचे  धाडस कोण करणार नाहीत अशी मागणी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना निवदेन देण्यात आले .

यावेळी मनसे कार्यकर्ते मोठया संख्येने जमले होते, 'महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी शरिया सारखा बळकट व सक्षम कायदा करा', 'महिलांच्या सुरक्षिततेसाठी शक्ती कायद्याला गती द्या',  नराधामसारखी वृत्ती ठेचण्यासाठी, महिलांना न्याय देण्यासाठी या नराधमांना फाशी द्या. 'खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा' शक्ती कायदा अमलात आणा, अशा आशयाच्या फलकाद्वारे मनसेने सरकारकडे मागणी केली आहे. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या होत्या.

शासनापर्यंत जनसामान्यांच्या प्रतिक्रिया पोहचाव्या जेणेकरून शासन तज्ज्ञ असे सरकारी वकील देऊन यशश्री शिंदे आणि नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार, हत्याकांडाबाबत आरोपीना लवकरत लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हि फाशी भर चौकात देण्यात यावी ज्यामुळे भविष्यात आपल्या माता भगिनींवर असे प्रकार करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही असे मनसे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी यावेळी सांगितले
 
याबाबत पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी यावेळी मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली या मोर्चाप्रसंगी मनसे कोकण संघटक संजय तन्ना, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार उपाध्यक्ष मनीषा पाचभाई रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर पनवेल तालुका सचिव अमोल पाटील,उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी तालुका उपाध्यक्ष चिंतामणी मुंगाजी, अभिजित घरत, स्वरूपा सुर्वे मनसे नेते अतुल चव्हाण यासह महिला पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments