कामोठेत शेतकरी कामगार पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन..
कामोठेत शेतकरी कामगार पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन
 

पनवेल : कामोठे मध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सिडको समाज हॉल समोर, सेंट्रल बँक चौक, सेक्टर 20, कामोठे येथे करण्यात आले आहे. माजी सभापती व नगरसेवक प्रमोद भगत यांनी या कार्यक्रमासाठी सर्व दहीहंडी, बाळ गोपाल यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
    शेतकरी कामगार पक्षातर्फे कामोठे सालाबाद प्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने दहीहंडी पथक या ठिकाणी येऊन हजेरी लावून सलामी देत असतात. तसेच दहीहंडी फोडल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी तर्फे पारितोषिक मानधन व बक्षीस देण्यात येते. या दहीहंडी पाहण्यासाठी सर्व नागरिक त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहतात. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 2024 या वर्षीची दहीहंडी मोठ्या जल्लोषात उत्सवात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या दहीहंडी उत्सवात  एकूण पारितोषिक 2 लाख 22 हजार 222 रुपयांची असणार आहेत. तसेच ट्रॉफी देखील देण्यात येणार आहेत . आठ थराच्या हंडी फोडणाऱ्या पथकाला प्रथम पारितोषिक (खुले) १ लाख ११ हजार १११ रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तर सात थराच्या  सलामीसाठी 5001, सहा थराच्या सलामीसाठी 3001 आणि पाच थराच्या सलामीसाठी 2001 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी कोळीगीत, लोकगीत, मराठी गाण्यांचा आम्ही सारे कलाकार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Comments