ओरायन मॉल तर्फे 14 सप्टेंबर रोजी रायगड वासियांसाठी "मोदक स्पर्धा"..
ओरायन मॉल तर्फे 14 सप्टेंबर रोजी रायगड वासियांसाठी "मोदक स्पर्धा"
पनवेल, दि.१२ (वार्ताहर) : पनवेल शहराच्या मध्यवर्ती वसलेला एकमेव मॉल "ओरायन मॉल" ही आता पनवेलची ओळख बनलेला असून अनेक आधुनिक व नवीनतम ब्रँडच्या वस्तू मिळण्याचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे. हा मॉल नुसते खरेदीचे ठिकाण नसून येथे स्थानिक संस्कृती व परंपरा जोपासण्याचे ही काम केले जाते. ओरायन मॉल संपूर्ण वर्षभर लोकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्या कलेला वाव मिळण्यास उद्युक्त करते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गणपती आगमनाचे निमित्त साधून सर्व रायगड वासियांसाठी "मोदक स्पर्धा" आयोजित करीत आहोत व त्यासाठी हेच निमंत्रण समजून अधिकाधिक स्थानिक लोकांनी भाग घेण्यास निमंत्रित करीत आहोत. 
या वर्षीच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठित कलाकार "दिव्या पुगावकर" सन्माननीय पाहुणे म्हणून या कार्यक्रमात सामील होत आहेत व कार्यक्रम अजूनच प्रेक्षणीय होत आहे. मोदक हा नुसता एक खाद्यपदार्थ नसून तो एक भक्ती, परंपरा आणि भावनेचे प्रतीक आहे. गणेश चतुर्थीला गणपतीसाठी केलेला प्रसाद "मोदक" आता संपूर्ण जगभर एक आवडता पदार्थ म्हणून पोहोचलेला आहे. 2017 मध्ये ओरायन मॉल सुरू झाल्यापासून मोदक स्पर्धा ही स्थानिक गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव मिळवून आपली कला लोकांपर्यंत पोहोचविण्याची एक उत्तम संधी आहे. दरवर्षी 50 हून अधिक सहभागीना ह्या उपक्रमात भाग घेऊन आपल्या पाक कौशल्याचे प्रदर्शन करण्याचे संधी मिळते. ही केवळ नुसती स्पर्धा नसून आपल्या पाककलेचा वारसा व आपले कौशल्य लोकांपुढे ठेवण्याची एक संधी आहे.  प्रत्येक व्यक्तीची पदार्थ बनवण्याची स्वतःची अशी एक वेगळी पद्धत असते. व त्यात असलेले वेगवेगळे घटक व त्यांचे अनोखे मिश्रण आपल्या स्वतःच्या पद्धतीने बनवून प्रत्येकाचा मोदक हा वेगळा बनतो. पारंपारिक उकडीचे मोदक व नवनवीन फ्लेवरचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून स्पर्धक या उपक्रमास एका अति उच्च शिखरावर पोहोचवतात.
ओरायन  मॉल स्थानिकांच्या कलागुणांना वाव देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहे. अशा ह्या उपक्रमास अनेक स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आम्हाला त्याचा अभिमान आहे व या वर्षी सुद्धा अशाच प्रतिसादाची अपेक्षा आहे. तुम्ही एक उत्तम मोदक बनवणारे असाल अथवा जिभेचे चोचले पुरवणारे असाल व खाद्यप्रेमी असाल तर ओरायन मॉलची ही मोदक स्पर्धा प्रत्येकासाठी काहीतरी खास घेऊन येईल. आम्ही आपणास आव्हान करीत आहोत की  ह्या स्पर्धेसाठी आणि या रायगडच्या प्रमुख शॉपिंग डेस्टिनेशनमध्ये असलेल्या परंपरा,नाविन्य आणि सामुदायिक भावनेचे साक्षीदार व्हा, आपली आपली कला, चव, मजा आणि उत्साहाने भरलेल्या या उपक्रमासाठी 14 सप्टेंबरला ह्या उपक्रमामध्ये सामील व्हा. या उपक्रमामध्ये नुसते सामील न होता विविध प्रकारच्या मोदकांची चव घेऊन पनवेलच्या शॉपिंग डेस्टिनेशन - ओरायन  मॉलमध्ये येऊन उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. 
लवकर या आपले मित्र मंडळी, परिवार व सगळे सोबतीसह 14 सप्टेंबर चा आणि आपला आनंद द्विगणित करा 
आम्ही आपली वाट पाहत आहोत.


फोटो : मोदक स्पर्धा पत्रिका
Comments