हॉटेल,ढाबा,लॉज मालकांची घेण्यात आली बैठक..
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा ते खारपाडा टोलनाका दरम्यान गोवा रोडलगत असलेले ढाबा, हॉटेल, लॉज मालक-चालक यांची मंथन हॉल, पनवेल या ठिकाणी बैठक घेण्यात आली.
सदर बैठकी दरम्यान परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल उबडे, वपोनि नितीन ठाकरे, वपोनि अनिल पाटील यांच्यासह वाहतूकशाखेचे अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हॉटेल, ढाबा, लॉजवर उत्सवा दरम्यान रोडवर पार्किंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरिता विशेष लोक नेमावेत, गणेशोत्सव करिता कोकणात जाणारे भाविक यांना अपघात अथवा इतर संकट वेळी मदत करावी, प्रत्येकाने आपल्या हॉटेल समोर येणार्या व जाणार्या रोड समोर अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावे. इतर सूचना देऊन उपस्थित हॉटेल चालक-मालक यांचे समस्यांचे निराकरण करण्यात आले.
फोटो ः पोलीस बैठक