आदिवासींच्या विविध मागण्यांचा शासन दरबारी निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ आदिवासींचे बेमुदत निर्णायक आंदोलन..
    आदिवासींचे बेमुदत निर्णायक आंदोलन...


पनवेल, दि.20 (संजय कदम) ः आदिवासींचा विविध मागण्यांचा शासन दरबारी निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ आज पनवेलसह रायगड जिल्हा, पालघर, ठाणे, नाशिक या ठिकाणी बेमुदत निर्णायक आंदोलन छेडण्यात आले आहे.
श्रमजीवी संघटना-महाराष्ट्रचे अध्यक्ष रामाभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आंदोलन विविध ठिकाणी छेडण्यात आले असून पनवेल येथे रायगड सरचिटणीस बाळाराम भोईर, रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, सरपंच कुंदा पवार, आदिवासी संघटनेचे नेते गणपत वारगडा आदींच्या मार्गदर्शनाखाली आज हे आंदोलन छेडण्यात आले असून यामध्ये आदिवासी बांधवांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्‍न, देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षानंतर ही प्रलंबित आहेत. त्यांचा रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वनहक्काची मान्यता आदिंसह हर घर नळ से जल पाणी योजना या संदर्भात या बांधवांना डावलण्यात येते. तसेच त्यांना हक्काच्या योजना मिळत नसल्याने आज हे आंदोलन छेडण्यात आले होते. शासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास येत्या 23 सप्टेंबर रोजी रायगड, नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयात हे आदिवासी बांधव ठिय्या मांडून बसणार आहेत. तसेच दि.25 सप्टेंबर रोजी हजारो आदिवासी बांधव त्या त्या ठिकाणावरुन पायी मंत्रालयाकडे धडक देवून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी आपला अधिकार मिळविण्याकरिता अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अशा पद्धतीचे मुक्कामी आंदोलन छेडणार असल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.



फोटो ः आदिवासी बांधवाचे ठिय्या आंदोलन
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image