प्रितम म्हात्रे यांनी उरण, करंजाडे येथील घेतले गणरायाचे दर्शन..
राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना 

पनवेल/प्रतिनिधी - राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले.

 प्रितम म्हात्रे यांनी उरण विधानसभा मतदार संघातील उरणसह करंजाडे परिसरातील विविध सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. यावेळी मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थिती होते.

प्रितम म्हणाले, पनवेलसह उरण भागात देखील गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा करीत आहोत. गणपती उत्सव मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त मोठया उत्साहात, जल्लोषात, धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करीत आहेत. तुम्हाच्या आयुष्यात चांगले दिवस येवो, सुख-समृद्धीचे, भरभराटीचे दिवस येवोत. या राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image