आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
पनवेल/प्रतिनिधी -- महाराष्ट्र शासन व वाय एम टी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वडघर येथे 20 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा.
यावेळी श्वसनलिकेचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, मुरुमे, ऍलर्जी पोटाचे विकार, आम्लपित्त, जुलाब, मूतखडा, पित्ताशयाचे खडे, स्त्रियांचे आजार, पाळीच्या तक्रारी, डोकेदुखी लहान मुलांचे आजार इत्यादी आजाराबाबतची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी वडघर ग्रामपंचायत हद्दीतील सर्वं नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.