२०२४ सारस्वत रत्न पुरस्काराने सन्मानित...
पनवेल वैभव / दि.23 (संजय कदम) ः पनवेलचे यशस्वी उद्योजक मंगेश परुळेकर यांना गोवा येथे झालेल्या सारस्वत चेंबर्स 2024 च्या कार्यक्रमात सारस्वत रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
सारस्वत रत्न हा पुरस्कार पनवेल मधील ओरायन मॉल व ऐंपी बिल्डर्स चे मालक मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. सिन्नपूरुष हॉल गोवा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व श्री डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. मंगेश परुळेकर हे कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण समाज पनवेल चे अध्यक्ष आहे त्यांनी या माध्यमातून अनेक समाजऊपयोगी कामे केली आहेत. त्यामध्ये बापदेव वाडी गाढेश्वर येथे आदिवासी पाड्यावर शिधा वाटप, खांदा कॉलनी पनवेल येथील अनाथ आश्रमा मध्ये रेशन , पंखे वाटप व सहभोजन, तसेच त्यांच्या मालकी च्या ओरायन मॉल येथे रक्तदाना शिबीर भरवले होते यात विक्रमी 166 बाटल्या रक्त संकलन केले होते. तसेच ओरायन मॉल पनवेलच्या माध्यमातुन त्यांनी पनवेल रायगड परीसरातील महिला, लहन मुले यांच्या साठी पाककला , चित्रकला स्पर्धा यांच्या सारखे ऊपक्रम राबऊन स्थानीक रहिवाशांच्या कला गुणांना वाव दिला आहे. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो ः मंगेश परुळेकर पुरस्कार स्वीकारताना