अज्ञात इसमाचा गळा आवळून खून...
पनवेल वैभव, दि.16 (वार्ताहर) ः पनवेलमधील ओरायन मॉलच्या जवळील पडीक जागेत एका इसमाचा गळा आवळून खुन करण्यात आला आहे.
पनवेल येथील ओरायन मॉलच्या मागे पनवेल रेल्वे स्टेशनकडे पायी जाणार्या रस्त्याकडे 30 ते 40 वर्षे वयोगटातील एका अनोळखी इसमाचा गळा पट्ट्याने आवळून खुन करण्यात आल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली असून, घटनास्थळी सहा.पो.आयुक्त अशोक राजपूत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून सदर मृतदेह ताब्यात घेवून त्या अज्ञात मृत व्यक्तीचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.