कै.वसंतशेठ ओसवाल पंचतत्वात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार..
ध्येयवादी बहुजनांचा आधारवड हरपला :  सुनील तटकरे

कळंबोली / प्रतिनिधी  -: रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाप्रमुख व सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष कै .वसंतशेठ ओसवाल यांच्या पार्थिवावर पालीतील स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कै. वसंतशेठ ओसवाल यांना आदरांजली अर्पण केली.                      
             सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये जातपात धर्मभेद यांच्या पलीकडेही जाऊन बहुजन वर्गासाठी तळागाळात जाऊन काम करून आपल्या कार्याचा ठसा लोकमानसावर वसंतशेठ ओसवाल यांनी उमटविला आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणारी सुधागड एज्युकेशन सोसायटीलां सुवर्ण झळाळी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे .राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना पक्षाने दिलेली जबाबदारी तितक्याच तोला मोलाने सांभाळून आपल्या कर्तुत्वाचा ठसा हा राजकीय पटलावर त्यांनी मांडलेला आहे.  त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात आम्हा सर्वांनाच एक पोकळी निर्माण झाल्यासारखेच असून ध्येयवादी विचारसरणी असणारे अन् बहुजनांचा एक आधारवडच हरपला असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना केले.
        राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांचे ४ सप्टेंबर रोजी पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले .त्यांचे पार्थिवावर ५ सप्टेंबर रोजी हजारोंच्या उपस्थितीत पाली येथील स्मशानभूमीत मुलगा महेश ओसवाल यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे ,विधान परिषदेतील आमदार अनिकेत तटकरे ,कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे,माजी आमदार बाळाराम पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर,काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आर.सी. घरत,पनवेल महापालिकेतील माजी नगरसेवक सतीश पाटील, प्रकाश देसाई ,किशोर जैन, विष्णू पाटील, वसंतशेठ ओसवाल यांचे भाऊ, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये ,सचिव रविकांत घोसाळकर, प्रशासन अधिकारी मिलिंद जोशी, नातेवाईक, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक वर्ग, विविध शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच हजारो हितचिंतक उपस्थित होते.
        यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये म्हणाले की वसंत शेठ ओसवाल यांनी सुधागड तालुक्यामध्ये तळागाळातील बहुजन वर्गासाठी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक, आर्थिक, भौतिक विकासामध्ये त्यांनी केलेलं उल्लेखनीय काम हे आम्हाला निश्चितच प्रेरणादायी असेच आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी असायची ,बहुजन वर्गासाठी त्यांनी केलेले काम हे निश्चितच प्रशंसनीय आहे. वसंतशेठ ओसवाल यांच्या निधनाने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. त्यांच्या निधना बद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गणेश उत्सवानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे माजी संचालक प्रकाश देसाई यांनी सांगितले आहे. 
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image