रामदास शेवाळे प्रतिष्ठान तर्फे सार्वजनिक व घरगुती सजावट स्पर्धा ...
पनवेल ता.10( बातमीदार) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रतिष्ठानकडून यंदा शहरात सार्वजनिक व घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हजारांची बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्यांना दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कळंबोली व अधिक माहिती साठी खालील नंबर वरती संपर्क करावा. पंकज सूर्यवंशीः ९७७३३०८००१ प्रशांत पुजारीः ७६६६४१२००३ विराट पवारः ८८५०२०८१६७ संपर्क साधन्याचे अवाहन रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांनी केले आहे. सहभागी स्पर्धकाला प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक. प्रत्येक सहभागी स्पर्धकास आणि मंडळास विशेष सहभाग सन्मानचिन्ह, घरगुती गणेश उत्सव - उत्कृष्ट सजावट, देखावा आणि पर्यावरण पूरक सजावट, सार्वजनिक गणेश उत्सव उत्कृष्ट सजावट, देखावा, पर्यावरण पूरक सजावट, शिस्तबध्द मंडळ.
उत्कृष्ट रील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक व बक्षीसे दिली जाणार आहेत. शिवसेनेचे शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यांसह त्यांचे सहकारी नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या घरी व मंडळात जाऊन सजावटीचे परीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे, सहभागी व्हा आणि रोख पारितोषिक व सहभाग सन्मानचिन्ह अशा विविध बक्षिसाचे मानकरी व्हा असे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले.