मंडळाचे सदस्य,पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ..
पनवेल वैभव, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील पायोनिअर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्या अभिनव युवक मित्र मंडळाच्या श्री गणेशोत्सव 2024-25 या अंकाचे प्रकाशन श्री गणरायाच्या आशिर्वादाने करण्यात आले.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील व सदस्य संजय कदम यांच्या शुभ हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, चिटणीस सचिन नाझरे, सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्ये, मयुर चिटणीस, राहुल सावंत, परेश बोरकर, प्रवीण सावंत, रुपेश नागवेकर, सुनील म्हात्रे, प्रकाश लाड, महेश सरदेसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सदस्य संजय कदम यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.
फोटो ः अंकाचे प्रकाशन व वाढदिवस शुभेच्छा