पनवेल मध्ये रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर उत्स्फूर्तपणे संपन्न
रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर उत्स्फूर्तपणे संपन्न  

पनवेल दि २२, (संजय कदम) : श्री प्रल्हाद रे झुलेलाल ट्रस्ट, श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटना आणि आम्ही रक्तदाते पनवेलचे यांच्यातर्फे रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते . 
                   श्री पूज्य सिंधी पंचायत झुलेलाल मंदिर विश्राळी नाका पनवेल येथे रविवारी (दि २२) सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला आयोजक ऍड मनोहर सचदेव, अमोल साखरे यांच्यासह संजय कदम व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानिमित्ताने आरोग्य तपासणीसह सेल्फी पॉईंट उभारण्यात आली होती. यावेळी  मनोहर सचदेव यांनी केलेल्या आवाहनाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.  तर आयोजक अमोल साखरे यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल पनवेल करांचे कौतुक केले व आगामी ५ जानेवारी २०२५ रोजी  आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला सुद्धा असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.  
फोटो - रक्तदान शिबीर
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image