शेकाप तालुका कार्यालयीन चिटणीसपदी "रामेश्वर आंग्रे" यांची नियुक्ती..
मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले...


पनवेल/प्रतिनिधी -- पनवेल तालुक्याला खरी नेतृत्वाची गरज आहे. आज शेकापच्या पनवेल तालुका कार्यालयीन चिटणीस पदी शेकापच डॅशिंग नेतृव म्हणून करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांची निवड ही करण्यात आली आहे. 

शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी मेळावा व पदनियुक्त सोहळ्या पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह मंगळवारी 3 रोजी संपन्न झाला यावेळी मा. आमदार बाळाराम पाटील, काशिनाथ पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल आंग्रे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

यप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जेष्ठ नेते काशिनाथ पाटील, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, गणेश कडू, राजेश केणी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

शेकापक्षाने अनेकांना मोठे केले. परंतु पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत. कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ पाहिजे. त्यामुळे पनवेल तालुक्याचे नेतृत्व हे पुन्हा शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून रामेश्वर आंग्रे च्या रुपाने करणार आहे. असे प्रतिपादन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी या नियुक्ती दरम्यान व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून वेळोवेळी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. करंजाडेतील समस्या असो की कोणाला मदत असो असे एकमेव व्यक्ती महत्व म्हणून रामेश्वर आंग्रेकडे पहिले जाते. सामाजिक कार्याचे महत्व लक्षात घेता आंग्रे यांची तालुका चिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
Comments